(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
नेवासा – हंडीनिमगाव सुरेशनगर रेशनकार्ड लाभधारक रेशन दुकानदार यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय समोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा हंडीनिमगाव सुरेशनगर येथील रेशन कार्ड लाभधारक यांनी निवेदनातून इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की हंडीनिमगांव सुरेशनगर गावातील धान्य दुकानदार श्री.सुरेशराव उभेदळ हे गेल्या अनेक वर्षापासून हंडीनिमगांव सुरेशनगर गावचे धान्य वाटप करत आहे. तसेच त्यांच्या बाबत गावातून आजपर्यंत कोणाचीही कुठलीही तक्रार आम्ही ग्रामस्थांची नाही.तसेच आम्हाला धान्य वेळेवर मिळावे यासाठी धान्य दुकानदार गावात सर्वत्र अधिसूचना देतात, वेळेवर वाटप करतात, तसेच सोबत धान्य पावती देखील देतात.आम्हाला कुठलीही अरेरावीची भाषा त्यांनी आजपर्यन्त केलेली नाही.
परंतू असे असून देखील आमच्या गावातील सरपंचाचा गावगुंड मुलगा विजय कल्याण उभेदळ यांनी स्वस्त धान्य रेशन दुकानदार श्री.सुरेशराव उभेदळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.परंतू सदरचा गावगुंड विजय कल्याण उभेदळ हा रेशनकार्ड लाभधारक नसून त्याला तक्रार करण्याचा कुठलाही अधिकार नसतांनी त्याने स्वस्त धान्य रेशन दुकानदार यांच्या विरुद्ध आपल्याकडे तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार बिन बुडाची असून वरील अर्जात काही तथ्य नाही.त्यास कारण असे कि आमच्या गावातील मौजे सुरेशनगर ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला असून त्यात दोषी सापडलेले सरपंच शैला कल्याण उभेदळ व ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार जिल्हा परिषदेने त्यांच्या अहवालात नमूद केलेला असून वरील सर्व प्रकरण उघडकीस आल्याने सरपंच शैला कल्याण उभेदळ हिचा मुलगा गावगुंड विजय कल्याण उभेदळ याने जाणीव पूर्वक स्वस्त धान्य दुकानदार यांना वेठीस धरण्यासाठी तक्रारी अर्ज केला आहे.
त्याच प्रमाणे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार कामी स्वस्त धान्य दुकानदार यांना त्रास देण्याच्या हेतूने त्याने तक्रार केली आहे.वरील प्रकरणांमध्ये हंडीनिमगांव सुरेशनगर गावातील सर्व रेशन कार्ड लाभ धारक यांची स्वस्त धान्य दुकानदार श्री सुरेशराव उभेदळ यांच्या बद्दल काही तक्रार नाही.तरी हे प्रकरण फक्त भ्रष्टाचार बाहेर निघाल्याने त्यांच्या आई शैला कल्याण उभेदळ यांच्यावर कार्यवाही होऊ नये यासाठी ते जाणीवपूर्वक दुकानदार यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणांमध्ये आम्ही सर्व हंडीनिमगांव सुरेशनगर रेशन कार्ड लाभ धारक स्वस्त धान्य दुकानदार यांच्यासोबत आहोत.
या प्रकरणी काय म्हणतात ग्रामस्थ..?
“गावगुंड विंजय कल्याण उभेदळ हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाल बसल्यास आम्ही सर्व रेशनकार्ड लाभधारक कुठल्याही क्षणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही देखील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या समर्थनार्थ ढोल बाजाओ आंदोलन करणार आहोत यांची आपण नोंद घ्यावि व गावगुंड विंजय कल्याण उभेदळ याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे .–– बाबासाहेब उत्तम गायकवाड, रेशन कार्ड लाभधारक,सुरेशनगर हंडीनिमगाव
