प्रशासकीयमहाराष्ट्र

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान हँडग्रेनेडचा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी जखमी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – पोलीस मुख्यालयात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रिलदरम्यान मोठी दुर्घटना घडली. शस्त्रास्त्र हाताळणीचे प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक हँडग्रेनेडचा स्फोट झाल्याने चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस व अग्निशमन दलाच्या वतीने कोणत्याही आणीबाणीच्या किंवा घातपाताच्या परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण कसे करावे, परिस्थिती नियंत्रणात कशी ठेवावी यासाठी नियमितपणे मॉक ड्रिलचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रात्यक्षिक सुरू होते.

यावेळी शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असतानाच अचानक एका हँडग्रेनेडचा जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका अचानक झाला की उपस्थित कर्मचाऱ्यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटावेळी ग्रेनेड अत्यंत जवळ असल्याने दोन कर्मचाऱ्यांच्या हाताची करंगळी तुटली, तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!