महाराष्ट्रराजकीय

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गणेश परिसराच्या वतीने २७ तारखेला भव्य नागरी सत्काराचे आयोजन

 (अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – आमदार विवेकभैय्या कोल्हे यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राहाता शहरात आमदार विवेक भैय्या कोल्हे मित्र मंडळ व गणेश परिसराच्या वतीने बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील वीरभद्र मंदिर परिसरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेश परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर संघर्षाची भूमिका कायम ठेवली. शेतकरी हित जपण्यासाठी घेतलेले ठाम निर्णय, विकासासाठी केलेले प्रयत्न आणि जनतेशी ठेवलेली नाळ यामुळे त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचाच करारी, अभ्यासू आणि जनहिताचा वारसा पुढे नेत युवा नेते तथा आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अतिशय कमी वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते धडाडीने काम करत असल्याची भावना कार्यकर्ते व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

आमदार विवेकभैय्या कोल्हे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी राहाता तालुका तसेच गणेश परिसरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!