प्रवरा शिक्षण संस्थाशैक्षणिक

प्रवरा परिवार कायम आपल्या सोबत – ना.राधाकृष्ण विखे पाटील

प्रवरा संस्थेची मोठी कामगिरी – प्रवरा अभियांत्रिकीचे २५० हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी (प्रतिनिधी) – लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील २५० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेली असून त्यामध्ये प्रामुख्याने टीसीएस, इन्फोसिस, एल अँड टी मा इंट्री, सिपला फार्मासिटिकल इमर्सन ,घरडा केमिकल्स, ग्लॅट पुणे, क्वालिटी की शॉक, जे एन के हिट्स, टी इ कनेक्टिव्हिटी पुणे, एस जी एस सिर्मा पुणे, सन फार्मासिटिकल लिमिटेड अशा विविध ४८ कंपन्यांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झालेली असून सर्वाधिक पॅकेज तेजस्विनी चिकणे हिला १३ लाख ८० हजार मिळाले तर निवड झालेल्या विद्यार्थ्याना साडे तीन लाखांचे सरासरी पॅकेज सर्वच विद्यार्थ्यांना मिळाले आहे. 

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,प्लेंसमेटचे प्रमुख डाॅ.अण्णासाहेब वराडे, सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

 

यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की प्रवरेच्या माध्यमातून सहकारातून समृद्धीकडे हा संदेश आपण घेऊन जावा सहकाराच्या माध्यमातून झालेले परिवर्तन हे आपण इतरांना सांगावे आणि प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराची ही निर्मिती केली जाते. विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये मोठी यश प्राप्ती करा परंतु प्रवरे च नाव हे उंच पदावरती कसे जाईल यासाठी कायमच प्रयत्नशील रहा प्रभरा परिवार कायम आपल्या सोबत राहील असेही आश्वासित केले. 

 

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असतानाच संस्थेच्या माध्यमातून सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्यामुळेच मोठी प्लेसमेंट प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली आहे. प्रवरेचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असावा आणि त्यालास जागतिक पातळीचे ज्ञान मिळावे यासाठी प्रवरा कायमस प्रयत्नशील असते. आपण जीवनात मोठे व्हा. प्रवरा शैक्षणिक संकुलाला आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत रहा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 

 

प्रारंभी प्राचार्य डॉ. गुल्हाने यांनी सन २०२४- २५ या कालावधीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा परिचय करून देत असताना महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रमांची माहिती दिली संस्थेचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील यांनी वेळोवेळी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देत असतानाच संस्थेच्या माध्यमातून नोकरी करणारा आणि नोकरी उपलब्ध करणारा विद्यार्थी घडावा यासाठी कायमच संस्था ही प्रयत्नशील असते. महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम हे सुरू असतात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असते. माजी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन महाविद्यालयाने केले आहे. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारे बदल हे विद्यार्थ्यांना विविध परिसंवादाच्या माध्यमातून माहिती प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून संवाद कौशल्य, प्रक्षेत्र भेटी विविध तज्ञांचे मार्गदर्शन बद्दलते औद्योगिक तंत्रज्ञान या विषयाचे परिसंवाद आणि चर्चासत्र होत असल्यामुळे या माध्यमातून एक परिपूर्ण विद्यार्थी हा ग्रामीण भागातून निर्माण होत आहे. यामुळेच आज महाविद्यालयाने अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे,संस्थेचे प्लेसमेंटचे समन्वयक प्रा.मनोज परजणे, महाविद्यालयांचे डाॅ.अण्णासाहेब वराडे यांनी अभिनंदन केले आहे.

 

“करोनाच्या काळात प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना कोविडचे सर्व नियम पाळून दोन वर्ष अथक परिश्रम घेत येथील प्राध्यापकांनी ज्ञान दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून राज्यात पहिल्यांदाच ५० टक्के फी सवलत दिली. आज या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.”

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!