अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी हंगामाचा राहाता गटात शुभारंभ

सौ. सुरेखा प्रभाकर निर्मळ यांच्या शेतात ऊसतोडणीचा प्रारंभ; कारखान्याचे संचालक व ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि., गणेशनगर यांच्या ऊसतोडणी हंगामाचा राहाता गटात (दि.१८) शुभारंभ करण्यात आला. राहाता गटातील ऊसउत्पादक शेतकरी सौ. सुरेखा प्रभाकर निर्मळ यांच्या शेतात ऊसतोडणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक, माजी संचालक आणि परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

या शुभारंभप्रसंगी कारखान्याचे संचालक ॲड. नारायणराव कार्ले पाटील, भगवानराव टिळेकर, संपतराव हिंगे, गंगाधर डांगे, माजी संचालक रामचंद्र बोठे, साहेबराव गाडेकर, धनंजय गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, संजय राजगुरू, शिवाजी आनप, बाबासाहेब लांडगे, अविनाश बनकर, अनिल बोठे, लक्ष्मण सदाफळ आणि नारायण भुजबळ यांच्यासह परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!