अहिल्यानगर जिल्हा

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडकाफ्ट २०२६’ स्पर्धा उत्साहात संपन्न;२५० हून अधिक संघाचा सहभाग 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांची ‘कोडकाफ्ट २०२६’ संगणक तंत्रज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेसाठी एक हजारांहून अधिक नोंदणी झाली होती. सुमारे २५० संघांनी सहभागासाठी नोंदणी केली, तर अंतिम फेरीसाठी २० संघांची निवड करण्यात आली. 

 

स्पर्धेत पुणे येथील व्हीआयटी महाविद्यालयाच्या ‘कोडिंग निंजा’ संघाने प्रथम, संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘शिवार’ संघाने द्वितीय, तर पुणे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘कोड कॅटॅलिस्ट’ संघाने तृतीय क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध समस्यांवरील नावीन्यपूर्ण उपाय सादर केले. उद्योग क्षेत्रातील 

पी.९९ साॅप्ट चे हेड ऑफ प्रॉडक्ट्स मयूर सोनवणे, सीओई हेड (कृत्रिम बुद्धिमत्ता) विनीत उपाध्याय, एचएसबीसी, पुणे येथील वरिष्ठ अभियांत्रिकी व्यवस्थापक श्री. अभिलाष कडू तसेच वरिष्ठ सॉफ्टवेअर विश्लेषक श्री. वैभव कुरकुटे आणि श्री. शुभम पुळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण करून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी

संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गुल्हाणे आणि संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मिनिनाथ बेंद्रे उपस्थित होते. अनिरुद्ध पांढरकर, श्रेया वाबळे, ओंकार तांबे, यश तांबे, सृष्टी काळे, रुचिर दर्शने आणि साईनाथ दरेकर या विद्यार्थ्यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!