महाराष्ट्र

संजीवनी युवा प्रतिष्ठान नोकरी मेळाव्यातुन रोजगाराला चालना-रेणुकाताई कोल्हे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव -आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक आणि आरोग्य सेवेचा वसा घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करत सामाजिक सेवेचा कार्यारंभ केला त्यातुन या परिसरातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगाराला चालना मिळावी म्हणुन प्रतिष्ठानमार्फत नोकरी मेळाव्याचे आयोजन दरवर्षी केले जाते असे प्रतिपादन कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिलाबचतगटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई विवेक कोल्हे यांनी केले. प्रत्येकांने प्रामाणिकता जोपासावी त्यातुन यश ध्येय सहज गाठता येते असेही त्या म्हणाल्या.

 

             कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकररव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवारी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन करतांना त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पजरणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या उल्लेखनीय योगदानाची माहिती देत कारखान्याच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी नोकरी महोत्सवामध्ये कोपरगाव तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील कान्याकोपऱ्यातून आलेल्या तब्बल 520 युवक युवतींनी मुलाखती दिल्या. याप्रसंगी ॲप्टीव कॉम्पोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गरवारे हायटेक फिल्मस, ईपीटॉम कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड, रुरलशोर्स बिझनेस सर्विस प्रायव्हेट लिमिटेड-संजीवनी कॉल सेंटर कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड आदी मल्टिनॅशनल कंपन्या या नोकरी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.

 

          सौ. रेणुकाताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, तालुक्यातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातुन पाठबळ देण्यांसाठी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आपण या सामाजिक कार्याचा आलेख उंचावण्यांचे प्रयत्न करत आहोत. येथील युवाशक्तीला पुणे-मुंबईच्या धर्तीवर के. जी. पासुन पी. जी. पर्यंतचे सर्व शिक्षण एकाच छताखाली मिळावे यासाठी ४४ वर्षापुर्वी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यातुन हजारो विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण मिळाले त्यातील शेकडो विद्यार्थी आज जगाच्या काना-कोप-यात संजीवनीचे नांव उज्वल करून रोजगार स्वयंरोजगारातुन येथील आर्थीक क्रयशक्ती वाढवण्याचे काम करत आहे हा तुम्हां: आम्हां सर्वांचा नांवलौकीक आहे. ग्रामिण भागातील मुला मुलींना रोजगाराच्या संधी मिळाव्या त्यांच्यातील स्कील वाढीस लागावे, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यात काम मिळविण्यांसाठी यशस्वी मुलाखतीचे तंत्र कसे आत्मसात करावयाचे याची शिकवणही संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतुन येथील सुशिक्षीत बेजरोजगारांना दिले जाते.

 

आज बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, त्या स्पर्धेत कोपरगांव पंचक्रोशीबरोबरच अहिल्यानगर जिल्हयातील प्रत्येक युवक पुढे जावा या उद्देशाने हा नौकरी मेळावा भरवला जातो. सुशिक्षीत बेरोजगारांच्या माता-पित्यांचे स्वप्न पुर्ण व्हावे, रोजगारातुन अर्थप्राप्ती व्हावी व घरदार पुढे चालावे या प्रामाणिक हेतुने संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नौकरी मेळावा आगळा-वेगळा ठरावा हिच अपेक्षा यातुन वाढीस लागावी असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी आयोजित नोकरी महोत्सवास संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपिन दादा कोल्हे कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान भेट देवून सहभागी झालेल्या कंपनीच्या प्रतिनिधी तसेच मुलाखतीसाठी आलेल्या युवक-युवतींचा सत्कार केला.यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!