महाराष्ट्र

संगमनेरमध्ये ‘दत्त धाम सरकार’चा भांडाफोड; भोंदू राजेंद्र गडगे अटकेत,अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची फसवणूक

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

संगमनेर – तालुक्यातील ‘दत्त धाम सरकार’ नावाने कार्यरत असलेल्या आश्रमाशी संबंधित स्वयंघोषित बाबा राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारींसोबतच एका महिलेची बदनामी केल्याच्या गंभीर आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, गडगे हा स्वतःला दैवी शक्ती लाभल्याचे सांगत विविध आजार बरे करून देणे, तसेच कौटुंबिक व आर्थिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत होता. या माध्यमातून तो अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एका महिलेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला.

या कारवाईदरम्यान राजेंद्र गडगे याच्यासह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास अधिक खोलात जाऊन केला जात आहे. फसवणुकीची व्याप्ती किती आहे, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

दरम्यान, याआधी राज्यात गाजलेल्या ‘भोंदू खरात’ प्रकरणाची आठवण या घटनेमुळे पुन्हा एकदा ताजी झाली आहे. त्या प्रकरणातही अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!