
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – शिवजन्म उत्सव समिती चितळी स्टेशन यांच्या संयुक्तविद्यमाने अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी समस्त शिवभक्तांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर प्रतिकृतीमधील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन व आरती करण्यात आली.यावेळी शिवरायांना अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या जयघोषाने चितळी स्टेशन परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याबद्दल माहिती विषद करून मनोगत व्यक्त केले.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर गायलेल्या पोवाड्यावर लेझीम नृत्य सादर करीत उपस्थित मान्यवरांचे मने जिंकले.यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसे वितरण करण्यात आले त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवजन्म उत्सव समितीचे सदस्य संतोष चौधरी, विशाल रंगाळे, जी.प. शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण हराळे, सेतू केंद्र चालक अनिल नळे, राजेंद्र ठाणगे, दत्तात्रय सुसरे, चांगदेव जाधव,भाऊसाहेब साळुंके , प्रशांत लांडे, गणेश गाठे, शुभम शेळके, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह चितळी स्टेशन व गाव परिसरातील समस्त ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




