
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
एकरुखे –प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा माध्यमिक विद्यालय, एकरुखे या विद्यालयाने शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेस विद्यालयाचे एकूण २५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी इंटरमिजिएट परीक्षेस १६ तर एलिमेंटरी परीक्षेस ९ विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व २५ विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.
इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी:
मयूर दिलीप काळे, यश दत्तात्रेय तुपे, सत्यजित विक्रम जाधव, सार्थक सुनील लेंडे, महेश गोविंद जोशी, श्रावणी दत्तात्रय आग्रे, तनुच्या गणेश सापिके, तेजस्विनी रवींद्र सातव, अश्विनी सुनील सापिके, स्नेहल अमोल शिंदे, सृष्टी शिवाजी अहिरे, कोमल विष्णू सोनवणे, खुशी संजय वाणी, श्रेया कचेश्वर त्रिभुवन, अश्विनी भाऊसाहेब खुरसने व महेश नवनाथ जगदाळे.
एलिमेंटरी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी:
साक्षी रामनाथ लोंढे, नेहा दामू अहिरे, अनुष्का गणेश कलगुंडे, तेजल रविकांत भुसाळ, स्वामिनी शिवाजी आग्रे, श्रद्धा सादर भवर, सोनाली केशव कुंदे, श्रद्धा विश्वनाथ आग्रे व स्नेहल सुनील सापिके.
या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत एकरुखेचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भोसले एस. बी. आणि चित्रकलेचे मार्गदर्शक शिक्षक श्री. हाळनोर बी. बी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.




