प्रशासकीयमहाराष्ट्र

संगमनेर-शिर्डी येथे सेवा दवाखाना स्‍थापन करण्‍यास महायुती सरकारची मंजुरी- मंत्री विखे पाटील

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी –राज्‍य कामगार विमा योजने अंतर्गत कामगारांच्‍या आरोग्‍य सेवकरीता संगमनेर आणि शिर्डी येथे सेवा दवाखाना स्‍थापन करण्‍यास महायुती सरकारने मंजुरी दिली असल्‍याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

 

       जिल्‍ह्यातील संगमनेर व शिर्डी येथे ३ हजार पेक्षा जास्‍त विमा धारक संख्‍या असल्‍याने या भागात कामगार विमा योजने अंतर्गत कामगारांच्‍या आरोग्‍य सेवेकरीता सेवा दवाखाना सुरु व्‍हावा अशी मागणी कामगारांच्‍या माध्‍यमातून तसेच खासगी उद्योग समुहाच्‍या वतीने करण्‍यात येत होती. या संदर्भात पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पाठपुरावा करुन, आरोग्‍य मंत्र्यांसमवेत बैठक घेवून या सेवा दवाखान्यास मंजूरी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते.

 

     संगमनेर येथे ५ हजार, शिर्डी येथे ९ हजाराहून अधिक विमा धारक कामगारांची संख्‍या आहे. ही सर्व बाब लक्षात घेवून कामगारांच्‍या आरोग्‍य सुविधां करीता संगमनेर व शिर्डी येथे नवीन सेवा दवाखाने तात्‍काळ सुरु करण्‍यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य कामगार विमा सोसायटीने मान्‍यता दिली असल्‍याचे उपसंचालक डॉ.संजय ढवळे यांनी सांगितले.

 

कामगारांसाठी सेवा दवाखान्‍याची सुविधा उपलब्‍ध होत असल्‍याने जिल्‍ह्यातील विविध क्षेत्रांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या कामगारांना या सेवा दवाखान्‍याचा मोठा दिलासा मिळणार असून, महायुती सरकारने घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयाचे उद्योग आणि कामगार जगतातून स्‍वागत झाले असून, पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे विविध कामगार संघटना आणि खासगी उद्योग समुहांनी आभार मानले आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!