धार्मिकमहाराष्ट्र

गोंधवणी येथील श्री महादेव मंदिरात;व्यावसायिक राजूभाऊ कक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी-गोपाल शिंदे

श्रीरामपूर – शहरातील गोंधवणी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महादेव मंदिर परिसरात (दि.२१) जानेवारी रोजी सम्राट हेल्थक्लबचे प्रोप्रायटर राजूभाऊ कक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

या उपक्रमासाठी नगरपालिकेच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर परिसरासह आजूबाजूच्या संपूर्ण भागाची सखोल स्वच्छता करण्यात आली. मंदिराचा परिसर स्वच्छ व पवित्र ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती व्यवसायिक राजूभाऊ कक्कड यांनी दिली.

व्यावसायिक असलेले राजूभाऊ कक्कड त्यांच्यासह त्यांचा मित्र परिवार सामाजिक व धार्मिक कार्यात पूर्वीपासून नेहमीच सक्रिय सहभाग घेत असून श्री.रामेश्वर व काशी विश्वेश्वर मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी सुरुवातीपासून मोलाचे सहकार्य केले आहे.मंदिर परिसरात विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम राबविले जातात हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांचा स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो.

स्वच्छता ही सेवा समजून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सामाजिक व धार्मिक कार्यात गोंधवणी परिसरातील मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. अशा समाजोपयोगी कार्यामुळे राजूभाऊ कक्कड यांची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांच्या पाठीशी सदैव श्री महादेवाचा आशीर्वाद राहो, अशी भावना यावेळी उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!