प्रशासकीयमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक १ मध्ये अस्वच्छतेवर नगरसेविका सोनियाताई बिट्टू कक्कड यांनी घेतली स्वच्छता मोहीम हाती

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 प्रतिनिधी-गोपाल शिंदे

श्रीरामपूर – नगरपालिकेच्या नुकत्याच निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेविका सोनियाताई बिट्टू कक्कड यांच्या प्रभागात मागील अनेक दिवसांपासून अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली होती.गुरुनानक नगर परिसरात सतीश दादा पठारे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचून राहिला होता.

नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रभाग क्रमांक 1मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना देताना टिपलेले छायाचित्र.

या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक उमेदवार यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ पाचारण करून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.

नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येवून तात्काळ स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मधील टिपलेले छायाचित्र.

 

स्थानिक उमेदवार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.सदर कचराकुंडीची अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसराची साफसफाई करून घेण्यात आली.या तत्परतेबद्दल प्रभाग क्रमांक 1 मधील समस्त नागरिकांनी आभार मानले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!