चितळी महाविद्यालयमहाराष्ट्रशैक्षणिक

चितळी महाविद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न;थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त आभिवादन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांमधील व्यवहारिक ज्ञान वाढवणे व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्याच्या प्रारंभी थोर समाजसुधारक संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाठ व पर्यवेक्षिका अनिता सातव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी अंजली कुऱ्हाडे व पलक पंडित यांनी मनोगत व्यक्त करत संत गाडगे महाराजांच्या जीवनातील मौलिक विचार मांडले. प्राचार्य नामदेव शिरसाठ यांनी संत गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. याप्रसंगी गंगाराम कुंदे यांनी “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे भजन सादर केले.उत्तरार्धात रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून गावातील ग्रामस्थ व सहकारी विद्यार्थ्यांना पदार्थांची विक्री केली. बदाम शेक, साबुदाणा वडा, समोसे, पाणीपुरी, ढोकळा, पोहे, नूडल्स, चकली, मॅगी, गुलाबजाम, मसाला चणे, मिसळपाव, चंपाकळी, भजी, पापड चाट तसेच हिरवा भाजीपाला आदी पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञानाचा अनुभव मिळाला.

 

यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शंकरराव चौधरी,चितळीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम, उपसरपंच सोना पगारे, दीपकराव वाघ,तुषार चौधरी, प्रकाश आरणे यांच्यासह चितळी-जळगाव परिसरातील अनेक ग्रामस्थांनी ग्राहक म्हणून सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या पदार्थांचा आनंद घेतला.हा उपक्रम प्राचार्य नामदेव शिरसाठ व पर्यवेक्षिका अनिता सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे आणि उत्साहात संपन्न झाला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!