चितळी महाविद्यालयमहाराष्ट्रशैक्षणिक

चितळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुरुकुल प्रकल्पांतर्गत; अशोक पॉलीटेक्निक महाविद्यालयात क्षेत्रभेट

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत शैक्षणिक क्षेत्रभेटीचा अनुभव घेतला. बुधवारी अशोक उद्योगसमूह व शैक्षणिक कॅम्पसमधील अशोक पॉलीटेक्निक महाविद्यालय येथे ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.

या क्षेत्रभेटीसाठी अशोक पॉलीटेक्निक महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी तीन बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण प्रवासाची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाने स्वीकारली होती.

या प्रसंगी अशोक पॉलीटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य अंजबापू शिंदे यांनी विद्यार्थ्यांना डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देत उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच विजय भोसले, सागर थोरात, निलेश दौंड व समन्वयक शिवाजी पटारे यांनी अशोक शैक्षणिक संकुलातील विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

क्षेत्रभेटीदरम्यान अशोक सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक सिद्धार्थ मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. या मार्गदर्शनाबद्दल विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.क्षेत्रभेटीच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य शिरसाट एन. एन. व पर्यवेक्षिका सातव ए. एस. यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विद्यार्थी व सहभागी शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

या क्षेत्रभेटीत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक महाविद्यालयासह इतर पाच अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती घेतली. या उपक्रमाचे नियोजन गुरुकुल क्षेत्रभेट नियोजन प्रमुख के. जे. लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी ए. एल. झुराळे, जी. एम. कुंदे व एस. एस. पाटील उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!