चितळी महाविद्यालयमहाराष्ट्र

शरद क्रीडा महोत्सवात चितळी महाविद्यालयातील मुलींच्या कबड्डी संघाचे उपविजेतेपद

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, चितळी व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने शरद क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. रयत शैक्षणिक संकुलांतर्गत बोरावके महाविद्यालय, सी. डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स व स्वामी सहजानंद भारती बी.एड. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जंगधने यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कबड्डी व खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चितळी व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने बोरावके महाविद्यालयाशी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात दमदार खेळ सादर केला. संघातील सिद्धी वाघ, श्रद्धा वाघ, देवयानी कातोरी, वैष्णवी चौधरी, अनुष्का वाघ व आकांक्षा गुंड यांनी उत्कृष्ट डावपेच दाखवत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

 

या यशाबद्दल संबंधित न्यू इंग्लिश स्कूल, चितळी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी, सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, प्राचार्य नामदेव शिरसाठ, पर्यवेक्षिका सौ. सातव, क्रीडा शिक्षक अरुण झुराळे,सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!