
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – माणूस कर्तृत्वाने,संस्काराने आणि नम्रतेने मोठा होतो हीच वृत्ती अंगी बाळगून आयुष्यभर जनसामान्यांच्या सुखासाठी झटणारे आणि जळगावचे वैभव असणारे संपतराव चौधरी पाटील भाग्यवान माणूस आहेत.समाजकार्यातून त्यांनी ओळख निर्माण केली,त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित करून देशसेवेला दिली.चौधरी पाटलांची दोन्ही मुलं खूप कर्तृत्ववान आहेत.

वडिलांचे उपकार कधीही फिटणार नाहीत .त्यांच्या डोळ्यांसमोर हा आनंद सोहळा साजरा झाला आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हे आपल्या मुलांना आशीर्वाद देण्याच्या भावनेतून आलेले होते.त्यांनी कमावलेल्या कीर्तीची आज खरं चीज’ झाल आहे. मुलं वडिलांच्या उपकारातून दहा टक्के का होईना उतराई झाली आहेत, त्यामुळे आज दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. कर्तृत्व असेल तरच माणूस मोठा होतो. यावेळी त्यांचा ७७ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असून भविष्यात त्यांचा १०० वा अभिष्टचिंतन सोहळा साजरा व्हावा,असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले.

राहाता तालुक्यातील आदर्शगाव जळगावचे माजी सरपंच व श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव नाथाजी चौधरी पाटील यांच्या अमृत महोत्सवी ७७ व्या अभिष्टचिंतनानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन, २१ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे करण्यात आले होते.यावेळी संचालक संपतराव चौधरी यांच्या ७७ व्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

या सोहळ्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, डॉ. मिलिंद दादा कोल्हे, जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,शिवाजीराव लहारे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, मा.आमदार भाऊसाहेब कांबळे, विजय दंडवते, श्रीरामपूर एमआयडीसी अध्यक्ष बाबासाहेब काळे, बबनराव डोंगरे, मारुती गोरे, काशिनाथ अण्णा नवले, हरिभाऊ नवले, कुमार शेठ होळकर, सुनील गुंजाळ, मंदार गुंजाळ, दादासाहेब चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे, शेतकरी नेते धनंजय धोरडे, ताहाराबाद संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, कैलास पाटील बोर्डे, राजेश कुंदे, डॉ. सुरज थोरात, आनंद काळे, अभिजीत पाटील, सचिन जगताप, भाऊसाहेब मोरे, ऍड. अशोकराव वाघ, विक्रम वाघ, चितळी सरपंच नारायण कदम, गोंडेगावचे सरपंच सागर बडे, रामपूरवाडी सरपंच संदीप सुरडकर, वाकडीचे सरपंच रोहिणी आहेर,पुणतांबाचे सरपंच स्वाती जालिंदर पवार, श्री गणेशचे संचालक एकनाथजी गोंदकर, बाबासाहेब डांगे, नारायणराव कार्ले, अरविंद फोपसे, आलेश कापसे, अनिल गाढवे, मधुकर सातव, महेंद्र गोडगे, विष्णुपंत शेळके, बलराज धनवटे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, बाळासाहेब चोळके, नानासाहेब नळे, अनिल टिळेकर, एम.डी. नितीन भोसले, सौ. शितलताई लहारे, जळगावचे अण्णासाहेब चौधरी, जळगाव सरपंच शिवाजीराव साबदे, भाऊसाहेब चौधरी, पंचायत समिती खेड विस्तार अधिकारी श्री. सुखदेव साळुंखे, ह.भ.प. विजय महाराज चौधरी, नवनाथ महाराज म्हस्के, बाबासाहेब महाराज डमाळे, बाळासाहेब महाराज रंजाळे, मोरे काका तसेच अमृत महोत्सव निमंत्रक समितीचे सर्व सदस्य आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते.यावेळी चितळी, जळगाव चौधरी वस्ती, चांगदेवनगर, खैरी, निमगाव, पुणतांबा येथील समस्त भजनी मंडळांचेही विशेष सहकार्य लाभले.ह.भ.प. भरत महाराज पठाडे,(मृदुंगाचार्य) गायनाचार्य ओंकार महाराज जगताप, शुभम महाराज बनकर आणि विजय महाराज चौधरी यांनी हरिकीर्तन कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक रंगत आणली.





