गुन्हेगारीप्रशासकीय

श्रीरामपूर शहर पोलीसांची बेकायदेशीर सावकारीवर धडक कारवाई

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – शहर पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी विरोधात मोठी कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहर परिसरातील वाहन बाजारात मोठ्या प्रमाणात उभी असलेली जुनी चारचाकी व दुचाकी वाहने तपासताना ही कारवाई करण्यात आली.

तपासादरम्यान तक्रारदार रोहित संतोष भालेकर (रा. बेलापुर रोड, बजरंगनगर, श्रीरामपूर) यांनी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांना अर्ज देत मनीष मुथा व सुनील मुथा (रा. बेलापुर बुद्रुक) हे दोघे बेकायदेशीर सावकारी करून त्यांची मोटारसायकल गहाण ठेवून जास्तीचे व्याज व मुद्दलाची मागणी करत असल्याची तक्रार केली होती.

या तक्रारीच्या चौकशीसाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर यांच्याकडे संबंधित व्यक्तींना सावकारी परवाना आहे का याची विचारणा करण्यात आली. त्यावर दोघेही अधिकृत सावकार नसल्याचा, तसेच त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचा लेखी अहवाल प्राप्त झाला.

यानंतर आज (१८ नोव्हेंबर २०२५) तक्रारदार समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहिले असता त्यांच्या अर्जाच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र. नं. २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) तथा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही बेकायदेशीरपणे मालमत्ता तारण ठेवून किंवा नियमबाह्य व्याजदराने सावकारी करत असल्याचे आढळल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!