प्रशासकीयमहाराष्ट्र

जळगाव येथे ग्रामसभा संपन्न;नूतन तंटामुक्ती समितीची स्थापना अध्यक्षपदी विजय चौधरी,तर उपाध्यक्षपदी सोपान गलांडे यांची निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथे मंगळवार, (दि. ४) रोजी ग्रामसभा श्री.रोकडोबा मंदिरात अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली.ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजीराव साबदे होते.ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले.

 

ग्रामसभेदरम्यान गावातील विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामसुरक्षा तसेच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सूचना आणि प्रस्ताव मांडत सक्रीय सहभाग नोंदवला.

 

या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नूतन तंटामुक्ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची सूचना यावेळी ग्रामसभेत मांडण्यात आली, ज्यास उपस्थित ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजुरी दिली.त्यानुसार अध्यक्षपदी विजय चौधरी, तर उपाध्यक्षपदी सोपान गलांडे यांची निवड करण्यात आली.यावेळी मावळते तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब चौधरी व उपाध्यक्ष विजय चौधरी यांनी आपल्या कार्यकाळाचा सविस्तर अहवाल सादर करत ग्रामस्थांचे सहकार्य व ग्रामपंचायतीच्या पाठबळाबद्दल आभार मानले. 

 

ग्रामसभेस ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेश साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी, सरपंच शिवाजीराव साबदे, उपसरपंच दिलीपराव चौधरी, यशवंत चौधरी,शंकर चौधरी, जळगाव सोसायटीचे अध्यक्ष सुरेश औताडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष सोपान गलांडे, विष्णू औताडे, किरण चौधरी, दयानंद गायकवाड, येलार गायकवाड, बाळासाहेब चौधरी,पोलीस पाटील राजेंद्र गायकवाड,अण्णासाहेब चौधरी, मच्छिंद्र चौधरी,महेंद्र चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. गोरख चौधरी, प्रवीण चौधरी, माजी अध्यक्ष बाबासाहेब चौधरी, अरुण चौधरी, संतोष कापसे आदींसह जळगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!