(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने ई-पिक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे. अनेक शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी अद्याप राहिली असल्याने संघटनेच्या निवेदनानंतर सरकारने मुदतवाढ देत ३ ऑक्टोबर २०२५पर्यंतचा अवधी दिला आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके उध्वस्त झाली असून पंचनामे सुरू आहेत. मात्र ई-पिक पाहणी न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पिक विमा तसेच कृषी विभागाच्या कोणत्याही योजना, सवलती वा अनुदानाचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.म्हणूनच उर्वरित शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबरच्या आत ई-पिक पाहणी करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.




