प्रशासकीयमहाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्याकरीता कागदपत्रे जमा करावेत;जळगाव तलाठी कार्यालयाकडून आवाहन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव परिसरातील शेतकऱ्यांचे दि. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन जळगाव येथील तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

 

शेतकऱ्यांनी आधारकार्ड झेरॉक्स, आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स, आधार लिंक मोबाईल क्रमांक तसेच नोट कॅम अॅपमधून काढलेले अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे फोटो (नाव, गट क्रमांक व पिकाचे नाव स्पष्ट दिसेल असे) ही कागदपत्रे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीत तलाठी कार्यालय, जळगाव येथे जमा करावीत. पिकांचे फोटो प्रिंट करण्याची आवश्यकता नसून ते थेट व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 9922155811 किंवा 7888181998 वर पाठवावेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शेतकरी बांधवांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!