महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध; पत्रकार बांधवांच्या पाठीशी ठाम – सौ. प्रभावती घोगरे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी  – त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी शिर्डी येथील मा. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल भारती यांना निवेदन सादर केले.

 

या वेळी बोलताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे थेट लोकशाहीवर हल्ले आहेत. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकार बांधवांच्या सुरक्षेसाठी ठोस यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे.

 

महाविकास आघाडीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, त्र्यंबकेश्वर प्रकरणातील दोषींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी. पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी ठोस कायदे व उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने कठोर धोरण आखावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

 

सौ. प्रभावती घोगरे यांनी पुढे सांगितले की, पत्रकार समाजातील वंचित, दुर्लक्षित व शोषित घटकांचा आवाज बनतात. त्यांच्यावर होणारे हल्ले हे फक्त व्यक्तीवरचे नाहीत तर संपूर्ण समाजाच्या स्वातंत्र्यावरचे आहेत. जर अशा घटना घडत राहिल्या तर लोकशाही धोक्यात येईल. म्हणूनच पत्रकारांचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची प्रथम जबाबदारी आहे.

 

या प्रसंगी महाविकास आघाडीचे सचिन चौगुले, सचिन कोते, ॲड. पंकज लोंढे, संजय आप्पा शिंदे, अमृत गायके, गणेश सोमवंशी, उत्तमराव मते, सचिन गाडेकर, किरण जपे, शरद भदे, संजय पगारे, सचिन उर्फ मुन्ना आहेर, शरद घोगरे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!