चितळी महाविद्यालयशैक्षणिकसांस्कृतिक

माजी विद्यार्थी स्व.गौरव गायकवाड यांच्या स्मरणार्थ चितळी महाविद्यालयाला नामफलक प्रदान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – चितळी (ता. राहाता) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला 2015 च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्व. गौरव देविदास गायकवाड यांच्या स्मरणार्थ ५० हजार रुपये किमतीचा ऍक्रेलिक नामफलक प्रदान करण्यात आला. हा नामफलक स्व. गौरव गायकवाड यांचे वडील देविदास गायकवाड यांनी महाविद्यालयास भेट दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन चितळी गावचे लोकनियुक्त सरपंच नारायण कदम यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाठ, पर्यवेक्षिका अनिता सातव, शिक्षकवर्ग, समस्त ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी पुणतांबा केंद्रातील शिक्षक संजय नळे, राजेंद्र थोरात, जालिंदर शिंदे, राजेंद्र जाधव, दिपक कुलकर्णी, सतिश मुंतोडे, विलास शेळके,विश्वास उबाळे, रावसाहेब थोरात , किरण पारधे, गणेश विघावे विक्रम वाघ,विजय चौधरी, मधुकर शेळके, डॉ. औताडे, संतोष गायकवाड, रुपेश गायकवाड, रविंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी देविदास गायकवाड व कुटुंबीयांना आपल्या सुपुत्र गौरव यांच्या आठवणीने गहिवरून आले. शाळेसाठी नेहमीच मदत करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या कार्याबद्दल सरपंच नारायण कदम यांनी विशेष कौतुक करून गायकवाड कुटुंबीयांचे आभार मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!