प्रशासकीयशैक्षणिक

श्रीरामपूर तालुक्यातील गोडेंगाव शाळेतील शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्या रद्द कराव्यात:जिल्हा परिषद प्रशासनाकडे ग्रामस्थांची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – तालुक्यातील गोडेंगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. 

 

ग्रामस्थ राजेंद्र चांगदेव थोरात यांनी हे निवेदन १ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्याकडे सादर केले असून निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन पुरस्कृत पी.एम. श्री योजनेअंतर्गत निवडलेल्या ५१६ शाळा उत्कृष्ट गुणवत्तेने विकसित करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक हे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळांचा दर्जा वाढत असून त्यामुळे मौजे गोडेंगाव येथील शिक्षकांची पुढील ४ ते ५ वर्षांपर्यंत बदल्या न करण्याचा शासन आदेश आहे.

 

गोंडेगाव शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन होऊ शकते आणि प्रशासन यास जबाबदार राहील. अशी निर्दास्त भूमिका ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडलेले आहे विशेष म्हणजे, या शिक्षकांची बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी समस्त गोंडेगाव ग्रामस्थांनी केली आहे. यामध्ये शिक्षकांची शाळेसाठी महत्त्वाची भूमिका व त्यांच्या नेतृत्वाखाली शाळांचा विकास या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

 

यावेळी सदर निवेदनाची माहितीप्रत व कार्यवाहीसाठी प्रशासनाच्या विविध स्तरांवर पाठवण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री, मंत्रालय, मुंबई; जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, जि.प. अहिल्यानगर; तसेच गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, श्रीरामपूर यांचा समावेश आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!