Uncategorized

सत्ताधारी लोकशाही संपवण्याचे काम करीत असताना, जनतेने जागरूक राहून आवाज उठवणे गरजेचे- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभावती जनार्दन घोगरे यांचा सन्मान समारंभ उत्साहात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी खुर्द – “न्यायविरोधी शक्तींशी लढण्याची क्षमता आणि जनतेशी नाळ जोडलेली कार्यशैली यामुळे प्रभावती घोगरे यांनी प्रियंका गांधी यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सत्ताधारी लोकशाही संपवण्याचे काम करीत असताना, जनतेने जागरूक राहून आवाज उठवणे गरजेचे आहे.”असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभावती जनार्दन घोगरे यांचा शनिवारी वेताळबाबा चौक, लोणी खुर्द येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावचे ज्येष्ठ नागरिक आबासाहेब आहेर यांनी भूषविले.यावेळी ते बोलत होते.

 

या प्रसंगी उपस्थित राहून संबोधित करताना वक्त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचा नेहमीच जनसामान्यांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा आणि सर्व समाजघटकांना एकत्रित घेऊन पुढे जाणारा शाश्वत विचार मांडला. सौ. प्रभावती घोगरे यांच्या प्रखर वक्तृत्वातून काँग्रेसचा दमदार संदेश थेट जनमानसापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहाता तालुक्यातील राजकीय दहशतीविरुद्ध प्रभावती घोगरे यांनी उभारलेला निर्भय लढा अधोरेखित करत, त्या यापुढेही वंचित समाजाचा आवाज बनून कार्यरत राहतील,असेही सांगितले.

सत्कार स्वीकारताना प्रभावती घोगरे म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे पेलणार असून, समाजहित व सामान्य जनतेच्या प्रश्नांच्या समाधानासाठी कटिबद्ध राहीन.” तसेच त्यांनी आदरणीय राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

आयोजित कार्यक्रमाला सरपंच जनार्दन घोगरे, सचिन गुजर, बाळासाहेब विखे, सुधीर म्हस्के, ॲड. पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, शशिकांत लोळगे, भगवानराव टिळेकर, अनिल बोठे, सचिन चौगुले, विठ्ठलराव शेळके, विवेक तांबे, उत्तमराव घोरपडे, ज्ञानेश्वर वर्पे, शीमोन जगताप, गंगाधर गमे, कानिफनाथ तांबे, बाळासाहेब गीधाड, अनिल थेटे, रंजीत बोटे, आप्पासाहेब घोगरे, दिपक विखे,भास्करराव आहेर, कैलास आहेर, बाळासाहेब आहेर,अण्णा तुपे, बाबासाहेब मापारी, उपसरपंच अर्चना आहेर, आशा आहेर, उर्मिला घोगरे,वर्षा घोगरे, सुजाता घोगरे, सुनिता कोरडे तसेच लोणी खुर्द महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन (मुन्ना) आहेर, अमोल घोगरे, शामराव घोगरे आणि शरद घोगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोणी खुर्द ग्रामस्थांनी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!