
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
मातुलठाण – श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षीका श्रीमती दिपाली रमेश पंधारे यांना खासदार भाऊसाहेब वाकचौरे मित्र मंडळ व साई अर्पण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे अकोला येथे भि. आं शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रहिमपूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे हा पुरस्कार खा . भाऊसाहेब वाकचौरे याच्या हस्ते प्रदान करण्यात आला या वेळी मातुलठाण गावील ग्रामस्थ उपस्थित होते श्रीमती पंधारे या मातुलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात आठ वर्षापासून कार्यरत आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम घेणे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना शिकवणे.
तसेच शाळेमधील १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे मुलांना त्यात भाग घेण्यासाठी आवड निर्माण करणे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे मुलांना शिस्त लावणे त्याच्या कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला परिसरात पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे




