Uncategorized

“मध्यस्त चले जाव” या मागणीसाठी बँक मित्र संघटनेचा एल्गार ८ ऑगस्टला काळया फिती लावून व काम बंद आंदोलन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीने ८ऑगस्ट,२०२५ रोजी “मध्यस्त चले जाव” या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. (दि.८ ) ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्ह्यातील सर्व बँक मित्र काळया फिती लावून व काम बंद ठेवले असून २३ जुलै रोजी आर्थिक विपन्नावस्थेत आत्महत्या केलेल्या चिस्तुर येथील रहिवासी निलेश गणोरकर, जे की वर्धा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या तळेगाव शाखेत बँक मित्र म्हणून काम करत होते, यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करून बँक, मध्यस्थ कंपनी यांचा निषेध व्यक्त केला. 

 

सरकार आणि बँका वित्तिय समावेशकता हे धोरण राबविण्यासाठी सुरवातीला स्वतःच बँक मित्रांच्या नेमणुका करत असे पण आता या नेमणुका मध्यस्थ कंपनी च्या मार्फत करण्यात येत आहेत आणि त्या प्रक्रियेत बँक मित्रांना मिळणारे कमिशन आता खूपच कमी झाले आहे. एकीकडे बँक मित्रांच्या वाढत्या वयानिशी त्यांच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढत आहेत तर दुसरीकडे त्यांना मिळणारे कमिशन खूपच कमी झाले आहे. यातून निर्माण झालेल्या आर्थिक विपन्नावस्थेत निलेश गणोरकर यांनी आत्महत्या करून आपल्या आयुष्याची अखेर करून घेतली. 

 

या बँक मित्रांना सेवेत सुरक्षितता नाही. निश्चित पगार नाहीत. मेडिकल, रजा, पेन्शन कुठलेच नियम लागू नाहीत. यामुळे बँक मित्रात खूप मोठी वैफल्यग्रस्तता आलेली आहे हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेतर्फे ८ऑगस्ट रोजी मध्यस्त चले जावो या घोषणेसह आंदोलन करण्यात आले आहे. या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनेच्या वतीने 8 ऑगस्ट रोजी लीड बँक ऑफिसर, स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी, राज्याचे मुख्यमंत्री, श्रम मंत्री तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना निवेदन देण्यात आले.

 

ज्यात मृत निलेश गणोरकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि बँक मित्रांच्या नेमणुकीतील मध्यस्त बाजूला सारून बँकेने त्यांच्या नेमणुका कराव्यात आणि त्यांना सुधारित सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहे.यावेळी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत साबळे,नितीन चिखले, भूषण थोरात,रवींद्र साबळे,शहाजी पुराणे,सुनील रानमाळे,नरेश कोठा,शुभम वाघ,गणेश शिंदे,निलेश वाघ सर्व बँकांचे बँक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!