
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुर्ण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात तब्बल दीड कोटी रुपयाची उधळपट्टी झाली असून राहाता तालुक्यातील वाकडी-पुणतांबा मार्गांवरील साडेसात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामावर निकृष्ट दर्जाचा ठप्पा पडला आहे.रस्त्याचे काम व्यवस्थित न करता दीड कोटीचा मलिदा नेमकं खाल्ला तरी कुणी असे आरोप जनतेकडून होत आहे.

राहाता तालुक्यातील वाकडी ते पुणतांबा असे ७. ६ किलोमीटर रस्त्याची आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून प्रशासकीय मंजुरी मिळाली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सदर काम प्रारंभ करण्यात आले होते यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांच्या निधीची शासनाकडून तरतूद करण्यात आली होती रस्त्याच्या कामाचा ठेका कोपरगावातील प्रसिद्ध ठेकेदाराला देण्यात आला होता रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक नागरिकांनी अनेकदा काम खराब होत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांना केली होती.

मात्र; पुढील दोनच महिन्यात संबंधित रस्ता ठीक-ठिकाणी उखाडला असल्याचे दिसून आले निकृष्ट कामाबाबत नागरिकांनी ओरड करत असमाधान व्यक्त केले होते कोपरगावच्या ‘त्या’ ठेकेदाराच्या चलढकल कामावर नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला असून ठेकेदाराच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून अधिकारी व ठेकेदारावर आमदारांचा वचक राहिला नसल्यामुळे निकृष्ट कामाला आणखी चालना मिळाली असल्याने या प्रकरणात कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही नामवंत अधिकारी चक्क ठेकेदाराला वरदहस्त देवून चेलेचपाटी करत असल्याचे आरोप होत आहे.

यासंदर्भात रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर यांनी आवाज उठवीला छावाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे यांनी कागदोपत्री पाठपुरावा केला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव शाखा अभियंता रवींद्र चौधरी,उपअभियंता वर्षराज शिंदे हे रस्त्याची पाहणी करण्यासाठी वाकडी-पुणतांबा रस्त्यावर आले होते यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच संदीप सुरडकर यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा प्रश्न विचारताच उपअभियंता वर्षराज शिंदे यांनी रागात स्थानिक लोकप्रतिनिधीलाच आरेतुरेची भाषा वापरून ‘ठेकेदार कसेही काम करेल यात तुला विचारण्याचा काय संबंध’ असे बोलून उत्तर देणं टाळून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे ठेकेदाराचे पाळलेले गुंड आहेत का असा सवाल उपस्थित केला जात असून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी सरपंच सुरडकर छावा ब्रिगेड संस्थापक विश्वनाथ वाघ,प्रदेश महासचिव राहुल रेळे, आरपीआय जिल्हाउपाध्यक्ष योगेश बनसोडे सामाजिक कार्यकर्ते जावेद सय्यद यांनी केली आहे.

सदर रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले होते यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र अनेक अडीअडचणीनंतर या रस्त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्याच्या कामाचा दर्जा खालवला असून याबाबत स्थानिक नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम करण्याच्या नावाखाली दीड कोटीचा मलिदा खाल्ला तरी कुणी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून उडवा उडवीचे उत्तर मिळत आहेत.
रस्त्याची पहाणी; कारवाईची हमी
संबंधित प्रकरण घडल्यानंतर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग राहाता येथून अभियंता काशिनाथ गुंजाळ यांनी वाकडी -पुणतांबा साडेसात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पाहणी केली यापाहणीत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे निष्पन्न झाले असून कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई होईल असे त्यांनी सांगितले आहे.
सरकारी अधिकारी आहेत की ठेकेदाराचे गुंड..?
कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी ठेकेदाराची पाठ राखण करत असून संबंधित रस्त्याच्या अडचणी बाबत सरपंच संदीप सुरडकर यांनी रस्त्याची पाहणी पाहणी करण्यास अधिकाराऱ्यांना बोलवले होते यावेळी सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले या प्रश्नाचे उत्तर देताना उपअभियंता वर्षराज शिंदे यांची जीभ घसरली त्यांनी थेट सरपंच संदीप सुरडकर यांनाच आरेतुरेची भाषा वापरली असून कोपरगावच्या ठेकेदाराला ते पाठीशी घालत असल्याचे आरोप सरपंच सुरडकर यांनी केला आहे.




