Uncategorized

अहिल्यानगर पोलिसांची कारवाई: १.०८ लाखांची अवैध दारू जप्त, ६ आरोपी अटकेत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – जिल्ह्यात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पोलिस पथकाने जामखेड, एमआयडीसी व नगर तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत ५ ठिकाणी छापे टाकून एकूण १,०८,६१९/- रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी विशेष पोलिस पथकाच्या ३ टिम तयार करून जामखेड, एमआयडीसी आणि नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीत पथके पाठवली. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने पंचासमक्ष छापेमारी करण्यात आली आणि हॉटेल काउंटरमध्ये लपवून ठेवलेला दारू साठा हस्तगत करण्यात आला.

 

जामखेड पोलिस स्टेशन हद्दीत हॉटेल साहेवा येथे कैलास साळुंके व राजेंद्र देवकाते यांच्या ताब्यातून ३७,४६० रुपये किमतीचा दारू साठा जप्त झाला. हॉटेल तांबे येथे ज्ञानेश्वर तांबे याच्याकडून १६,८५४ रुपयांचा, तर हॉटेल कावेरी येथे मोहित पवार याच्याकडून ५,०८० रुपयांचा देशी-विदेशी दारू साठा हस्तगत करण्यात आला. या तिघांविरोधात अनुक्रमे गु.र.नं. ३६७, ३६८ व ३६९/२०२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल नॅशनल येथे आशिष रामनानी याच्याकडून १५,७२५ रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला असून गु.र.नं. ४९१/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल आदित्य येथे लक्ष्मण साळुंके याच्याकडून ३३,५०० रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला असून गु.र.नं. ५५०/२०२५ अन्वये कारवाई झाली आहे.

 

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील (कर्जत विभाग) आणि अमोल भारती (नगर शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह पोसई राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेका शंकर चौधरी, पोहेकों अजय साठे, दिगंबर कारखिले, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, पोहेका सुनिल पवार, पोकों सुनिल दिघे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी सहभाग घेतला.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!