
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – राहुल राजळे
नेवासा – तालुक्यातील विविध गावांमधून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यांना युवा नेते उदयन गडाख यांनी दिंडी मार्गावर भेटी देऊन दिंडीतील महाराज, विणेकरी, वारकरी यांचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणाले की, वारीमध्ये सहभागी होऊन वारकरी सामाजिक बांधिलकी जपत असतात. दैनंदिन जीवनातून थोडा वेळ बाजूला ठेवून, आपला गाव व परिसर सुखी राहावा यासाठी भक्तीभावाने पांडुरंगाच्या चरणी ते लीन होतात. दिंडी सोहळा ही महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे.
या वेळी उदयन गडाख यांनी कारेगाव, नेवासा बु., पानेगाव, लोहगाव, माका, गोंडेगाव, उस्थळ दुमाला, भेंडा, भानसहिवरे, शिंगवे तुकाई, पिचडगाव, सजलपूर, घोडेगाव, म्हसले, शनी शिंगणापूर, चांदा, नेवासा मध्यमेश्वर, हिंगोणी, गोमळवाडी या गावांतील दिंड्यांना भेट देत वारकऱ्यांशी संवाद साधला व स्वागत केले.दिंडी मार्गावरील वारकऱ्यांच्या सेवेसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमी तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
