Uncategorized

लोणीच्या विखे पाटील पॉलिटेक्निकच्या मुलींची तंत्रशिक्षण परिक्षेत बाजी

कु.श्रध्दा निर्मळ ९३.७४ टक्के गुण- श्रीमती सिंधूताई विखे पाटील सुवर्ण पदकाची ठरली मानकरी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी –राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून लोणी येथील पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निकने दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली असून क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा विभागातील कु. श्रध्दा निर्मळ ९३.७४ टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावीला असून श्रीमती सिंधूताई विखे पाटील सुवर्ण पदकाची मानकरी ठरली असून याच अभ्यासक्रमातील कु. साक्षी शिंदे ९२.२९ टक्के गुणांनी द्वितीय आणि मेकॅट्रॉनिक्स विभागातील कु देवयानी आढाव हिने ९१.७० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी यांनी दिली

 

विभागवार प्रथम तिन क्रमांकाचे मानकरी कॉम्प्युटर विभाग – प्रथम कु. साक्षी मरकड ९१.३१ टक्के, द्वितिय कु. मनस्वी पोकळे ९०.९१ टक्के, तृतिय कु. सलोनी घोडेचोर ९०.६३. केमिकल – साई बोरसे ८९.११ टक्के, कृष्णा पाटणकर ८८.२८ टक्के, सुनिता दुषिंग ८८.०६ टक्के, सिव्हिल – अथर्व सराफ ८७.२६ टक्के, कु. तेजस्वी बडाख ८६.३७ टक्के, ओम दिघे ८५ टक्के, मेकॅनिकल- आदित्य आहेर ९०.९२ टक्के, प्रफुल्ल निर्मळ ८६.०५ टक्के, सुरज भागवत ८२.१५ टक्के, ऑटोमोबाइल – श्रेयस कुलकर्णी ७९.४० टक्के, अथर्व जगदाळे ७७.०१ टक्के, क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा – कु. श्रध्दा निर्मळ ९३.७४ टक्के प्रथम, कु. साक्षी शिंदे ९२.२९ टक्के, समर्थ निंबाळकर ९०.२४ टक्के, मेकॅट्रॉनिक्स विभागात देवयानी आढाव हीने ९१.७० टक्के गुण प्रथम, प्रणव खिलारी ८९.५६ टक्के, कु. कोमल लांडे ८७.७८ टक्के तसेच इंटेरीयर डिझाईन अँण्ड डेकोरेशन कोर्समध्ये कु. संस्कृति मुंदडा ८३.३७ टक्के, प्रतिक सांगळे ७८.२५ टक्के, कु. ज्योती ढोमसे ७६.५० टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजय राठी, उपप्राचार्य प्रा. नामदेव गरड, सर्व विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र बेलकर, प्रा. रामनाथ लावरे, प्रा. राजेंद्र निंबाळकर, प्रा. रवींद्र काकडे, प्रा. एकनाथ घोगरे, प्रा. विजयश्री वैद्य, प्रा. संदीप गोर्डे, प्रा. निकीता पानगव्हाणे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!