
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री.गणेश विद्यालयाच्या वतीने गुरुकुल विभागा अंतर्गत गणेश परिसरातील रांजणगाव शिवारात शालेय विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी व्यवसायिक ज्ञान घेतले तसेच यादरम्यान एकत्र बसून वनभोजन करत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटत क्षेत्रभेटीच्या अविस्मरणीय क्षणाला आठवणीत जतन केले.

क्षेत्रभेटी दरम्यान वाकडी शिवारातील रांजणगाव येथील गौरी-गौतम पोल्ट्री फार्मवर भेट दिली प्रत्यक्षात पक्षांची निगा कशी राखली जाते याची माहिती जाणून घेतली कुक्कुटपालन व्यवसाय काय असतो व्यवसाय कसा केला जातो याच महत्त्व विद्यार्थ्याना समजावं विद्यार्थ्यांना शालेय वयातच व्यवसायाचे धडे मिळावे हाच मुख्य उद्देश्य असल्याचे विद्यालयाचे मुख्यध्यापक वसावे के.के यांनी सांगितले.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी पक्षांचे आरोग्य व काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले जर कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि जिद्दीने केला तर शेतीपूरक व्यवसायाला या व्यवसायाची जोड मिळू शकते.

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतो म्हणून भारतातील नागरिकांनी अंडी सेवन करायला पाहिजे म्हणून संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असे आव्हान विद्यार्थी व पालकांना केले यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आर्थिक नियोजन,श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजून उद्योजक बनण्याचे स्वप्न पहावे खऱ्या अर्थाने आज आपल्या रांजणगाव मध्ये घोगळ परिवाराने कुक्कुटपालन व्यवसाय मधून एक वेगळा उद्योजकतेचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो असे सांगितले.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात कुक्कुटपालन व्यवसाय कसा केला जातो त्यासाठी किती काळजी घ्यावी लागते कावेरी क्रॉस या जातीच्या कोंबड्यांची काळजी कशी घेतात खाद्य कोणते लागते त्यांची स्वच्छता कशी ठेवतात हे प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने पाहिले विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून एक नव्या व्यावसायिकतेचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी डॉ.संदीप आहेर आणि डॉक्टर संतोष वाघे यांना आपल्या मनातील विविध शंका विचारून या व्यवसायाचे महत्त्व समजावून घेतले.

यावेळी पोल्ट्री फार्मचे प्रमुख कारभारी घोगळ पाटील,रवींद्र कारभारी घोगळ,किरण कारभारी घोगळ यांनी विद्यालयातील सर्व सेवकांचा यथोचित सन्मान करून स्वादिष्ट असे चहा नाश्त्याची व्यवस्था केली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.वसावे के.के सर यांनी घोगळ परिवाराने क्षेत्रभेटीला परवानगी दिल विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन दिले याबद्दल घोगळ परिवाराचे आभार मानले. दुपारच्या सत्रात वनभोजन झाल्यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख भांगरे मॅडम यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला असे दिसून आले.

या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, रांजणगावच्या प्रथम नागरिक सरपंच सुनीताताई कासार, श्री सोपानकाका कासार, श्री वसावे के के सर, भाऊसाहेब घोगळ, दत्तात्रय भालेराव उपस्थित होते,श्री.किशोरकुमार चव्हाण, दीपक लोंढे, यांनी साऊंड सिस्टिमची व्यवस्था करुन दिली.यावेळी गुरुकुल विभाग प्रमुख कैलास भोये, विश्वेश्वर लाव्हारकर, यांनी सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.




