प्रशासकीयमहाराष्ट्र

संगमनेरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र;१०.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून मटका अड्ड्यांचा नायनाट!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस पथकाने मटका जुगार अड्ड्यांवर दोन ठिकाणी मोठी कारवाई केली. २० जून २०२५ रोजी ही कारवाई पार पडली असून, एकूण ३५ जणांना अटक करण्यात आली असून १० लाख ४६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक (परिविक्षाधीन) श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

 

पहिली कारवाई संगमनेर शहरातील तेलीखुंट परिसरात करण्यात आली. येथे कल्याण मटका हारजितीचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचांना समवेत घेऊन विशेष पथकाने छापा टाकला असता तेलीखुंट परिसरातील २९ आरोपी:१) शंकर इटप, २) दत्तात्रय इटप, ३) नानासाहेब जाधव, ४) सुरज ताम्रकर, ५) आण्णासाहेब खताळ, ६) रविंद्र फासे, ७) हाँसीराम कहांडाळ, ८) इकबाल शेख, ९) शेखर जाधव, १०) नानासाहेब उंकीडे, ११) रामदास माळी, १२) कैलास जाधव, १३) शिवाजी सातपुते, १४) राजू झांबरे, १५) मधुकर भोर, १६) बाळासाहेब पवार, १७) भाऊसाहेब काळे, १८) शंकर सवारगे, १९) रमेश सरोदे, २०) दगडू पवार, २१) दत्तू अनाप, २२) अस्लम शेख, २३) हरिभाऊ पवार, २४) मनोहर अभंग, २५) संभाजी साळवे, २६) सुदर्शन इटप, २७) सोमनाथ यादव, २८) विश्वनाथ आल्हाट, २९) सुभाष खैरे.असे एकूण २९ इसम मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळले. या ठिकाणी ७१,६५० रुपये रोख रक्कम, २,२९,००० रुपये किमतीचे १२ मोबाईल, ४,३५,००० रुपयांची १० वाहने आणि मटका साहित्य असा एकूण ७,३५,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याच दरम्यान दुसरी कारवाई कोल्हेवाडी रोड परिसरात करण्यात आली. येथेही तशाच स्वरूपाची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कोल्हेवाडी रोडवरील ६ आरोपी१) अशरफ सय्यद, २) हसनेन पटेल, ३) रियाज देशमुख, ४) नजाकत सय्यद, ५) साहिल जहाँगिरदार, ६) आयान सय्यद.कल्याण मटका जुगारात गुंतलेले आढळले. त्यांच्या कब्जातून ५६,६६० रुपये रोख, १,१२,००० रुपये किमतीचे ६ मोबाईल, १,४२,००० रुपये किमतीची ३ वाहने आणि जुगार साहित्य असा एकूण ३,१०,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १०,४६,३१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गु.र.नं. ५६६/२०२५ आणि ५६७/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर श्री. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, जालिंदर दहिफळे यांनी सहभाग घेतला. यावेळी शहरातील इतर पानटपऱ्या आणि अवैध कत्तलखान्यांची तपासणी करण्यात आली, मात्र काहीही आढळले नाही. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.ही कारवाई मटका जुगार अड्ड्यांवर मोठा आघात ठरणारी असून पुढील कारवाया सुरुच राहणार असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!