प्रवरा शिक्षण संस्थामहाराष्ट्र

ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयटीआयमध्ये प्लेसमेंट कॅम्पस व वृक्षारोपण कार्यक्रम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट, अहिल्यानगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे राज्याचे जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त प्लेसमेंट कॅम्पस आणि वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अहिल्यानगर एमआयडीसीमधील Classic Wheels Ltd. आणि Kaizen Engineering Pvt. Ltd. या नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यांनी एकूण ९० प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये Classic Wheels Ltd. ने १५ आणि Kaizen Engineering Pvt. Ltd. ने १४ प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली. एकूण २९ प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली.निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा ट्रेडनिहाय तपशील खालील प्रमाणे फिटर – ५, वेल्डर – ६, मोटार मेकॅनिक – ६, मशिनिस्ट – ६, इलेक्ट्रिशियन – ३, वायरमन – २, टर्नर १.

 

संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळत आहेत. संस्थेचे एमआयडीसीमधील स्थान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगानुभव घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.”

 

कार्यक्रमात वृक्षारोपण उपक्रमही राबवण्यात आला. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शिक्षक, प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारचे वृक्ष लावले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पी. एम. गायकवाड (डायरेक्टर जनरल – प्रशासन), श्री. सुनील कोल्हापुरे (डायरेक्टर – टेक्निकल), डॉ. अभिजीत दिवटे (डायरेक्टर – मेडिकल), प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी आणि संपूर्ण आयटीआय टीमचे मोलाचे योगदान लाभले.या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!