
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेअंतर्गत असणाऱ्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी गौरव हजारे यांची स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत कनिष्ठ सहाय्यक या पदावरती निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आशिष क्षीरसागर यांनी दिली आहे.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्था विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम इ. उपक्रमाचा समावेश होतो. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जलसंपदामंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले आहे.
