प्रवरा शिक्षण संस्थालोणीशैक्षणिक

विखे पाटील महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागातील सुशिल राठोड यांची शासकिय सेवेत निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी सुशिल देविदास राठोड यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व हवामान बदल विभाग महाराष्ट्र शासन येथे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदावर निवड झाली अशी माहीती महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. आर. ए. पवार यांनी दिली.

 

पर्यावरण शास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थी आहेत. त्यांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डाॅ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक डाॅ. आर. ए.पवार, उपप्राचार्य डॉ. शांताराम चौधरी, डॉ. अनिल वाबळे, डॉ. छाया गलांडे, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डाॅ. मनोज परजणे,डाॅ. हरिभाऊ दुबे आणि आप्पासाहेब शेळके.विभाग प्रमुख डाॅ. अरुणा झिने यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

 

या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे यांचे सह संस्थेतील सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.   

 

 महाविद्यालयाने दिलेले प्रोत्साहन त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून मिळालेली माहिती यामुळे मला हे यश मिळवता आले असे राठोड यांनी सांगतानाच प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच येथील कर्मचाऱ्यांना देखील पुढील शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते यासाठी त्यांना विविध सेवा सुविधा या उपलब्ध करून दिल्या जातात असेही सांगितले. 

   

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!