Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखालीडॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारले वसतिगृह

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर –शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या पद्मश्रीं डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौडशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

डाॅ.विखे पाटील फौडेशनच्या कॅम्पस मध्ये सुमारे सहाशे विद्यार्थीनीच्या राहाण्याची सुविधा असलेले वसतिगृह फौडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे.या वसतिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३व्या जयंती दिनाचे औचित्य साधून या सिंधू वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण आ.शिवाजीराव कर्डीले डाॅ सुजय विखे पाटील आ.मोनिका राजळे आ.काशिनाथ दाते आ.विठ्ठलराव लंघे आ.अमोल खताळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर फौडेशनचे डाॅ अभिजीत दिवटे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांनी रिमोट द्वारे वसतिगृहाच्या सिंधू नामफलकाचे तसेच कोनशिलेचे अनावरण केले. इमारतीची पाहाणी करून समाधान व्यक्त डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शिक्षण आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यात फौडेशनची भूमिका नेहमीच सामाजिक बांधिलकीची राहीली आहे.ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या परंतू कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्याचा विचार खासदार साहेबांनी दिला तोच पुढे घेवून जाण्याचे काम आम्ही करीत आहोत.अवयव प्रत्यारोपणची सुविधा डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आहे.उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डॉ विखे पाटील महाविद्यालयचा गौरव झाला असल्याचा अभिमान असल्याचे विखे पाटील म्हणाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!