
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार शुक्रवारी पंचायत समिती राहाता येथे विद्यालयास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. राज्य शासनाने शाळेच्या भौतिक सुविधा मध्ये अमुलाग्र बदल घडून यावा यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी लाखो रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याने शाळांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली. जिल्हा परिषदेच्या शाळा व खाजगी सर्व माध्यमांच्या शाळांचा सहभाग यात होता, राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुच येथील पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयास द्वितीय क्रमांकाचे दोन लक्ष रुपयाचा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते विद्यालयास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीमध्ये विद्यालयाचा विविध परीक्षांचा निकाल, भौतिक सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, इमारत, क्रीडांगण, सीसीटीव्ही सुविधा, मंथन, एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षा, रेखांकला परीक्षा, विविध स्पर्धांचे आयोजन, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेसचे आयोजन, एमपीएससी, यूपीएससी परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र, करिअर गाईडन्ससाठी तज्ञ मार्गदर्शकांची शिबिर, प्रशस्त अभ्यासिका आणि स्मार्ट क्लासरूम या आधारावर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघेरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गंभीरे,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, ज्येष्ठ विस्तार अधिकारी विष्णू कांबळे, केंद्र प्रमुख कानिफनाथ कोळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य के.बी. बारगुजे, उपप्राचार्य श्रध्दा वाणी , प्राथमिकचे मुख्याध्यापक नवनाथ घुगे , पर्यवेक्षक आण्णासाहेब तांबे , कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. संदीप म्हस्के , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुश्मिता विखे पाटील, सचिव भारत घोगरे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
