
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेतील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संदेश पिंगळे याची नुकत्याच झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागामध्ये कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश दळे यांनी दिली.नुकत्याच झालेल्या भरतीसाठी १८४६ जागेसाठी सुमारे दीड लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होतो. यामध्ये संदेश पिंपळे याचा खुल्या वर्गात २४२ तर इतर मागास वर्गामध्ये २१ वा क्रमांक मिळवला.
यावेळी संदेश पिंगळे याचा सन्मान प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक प्रा.डॉ.उत्तमराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप महाले, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष क्षीरसागर, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.चंद्रकला सोनवणे व इतर शिक्षक उपस्थित होते.सदर विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा.महेश चंद्रे व इतर शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले आहे.
