प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचा सौरभ शिरसाठ याची विद्यापीठ संघात निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या प्रवरा कृषि शास्त्र संस्थेतील सौरभ शिरसाठ याची आचार्य नरेंद्र देवा कृषी विद्यापीठ, अयोध्या येथे होणाऱ्या बाविसाव्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठ स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरीच्या मुलांच्या कबड्डी संघात निवड झाली असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिलीप महाले यांनी दिली आहे. 

 

सदर स्पर्धा दिनांक २ मे ते ५ मे दरम्यान उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथे होणार आहे.सौरभ शिरसाठ याचा प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप महाले, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष शिरसागर आदी उपस्थित होते.त्यास क्रीडा संचालक प्रा. सिताराम वरखड यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

 प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डाॅ. सुश्मिता विखे पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे , प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक प्रा.डॉ.उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले. 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!