भौगोलिकमहाराष्ट्र

वाकडी परिसरात उसाच्या शेतात लागलेल्या आगीवर तात्काळ नियंत्रण;श्री.गणेश साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाची तत्परता

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

चितळी – गणेश परिसरातील वाकडी (ता.राहाता) येथील चिंचमळा भागात दोन एकर ऊस आगीच्या विळख्यात सापडला.श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशमन यंत्रणेच्या प्रयत्नामुळे या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने सुदैवाने पुढील हानी टळली आहे.

 

 

रविवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास शेतकरी सुहास यादव यांच्या गट क्रमांक १०१/२ मधील उसाच्या शेतातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ दिसू लागल्याने शेजारील जागरूक शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती श्री.गणेश कारखान्याचे संचालक विष्णुपंत शेळके यांना दिली.यावेळी त्यांनी प्रसंगवधान राखून गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे व उपाध्यक्ष शिवाजी तात्या लहारे यांना याबाबत दूरध्वनीद्वारे सूचित केले.त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी रवाना केले.यावेळी अग्निशमन वाहनचालक संतोष फोपसे,श्रीकांत गोरे हे तत्परतेने अग्निशमन घेऊन अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले याघटनेत दोन एकर ऊसासह ड्रिप इरिगेशन जळून खाक झाले अंदाजे २लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

गणेश कारखान्याची अग्निशमन यंत्रणा तात्काळ दाखल झाल्याने आसपासच्या क्षेत्रामधील उसाचे शेत आगीपासुन बचावले आहे.ग्रामस्थांना आग लागल्याची माहिती समजताच मोठी गर्दी केली. आग वेळीच नियंत्रणात आल्याने सुदैवाने पुढची दुर्घटना होण्यापासून वाचली आहे.मात्र; याठिकाणी आग कशी लागली यांचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.अग्नीशमन यंत्रणेने अथक प्रयत्न करून आगीवर प्रचंड शिताफिने नियंत्रण मिळवत ही आग आटोक्यात आणली यासोबत स्थानिक नागरिकांनी व अग्निशमन यंत्रणेने प्रयत्न करत वेळीच आगेला आटोक्यात आणले यामुळे शेजारील 10 एकर ऊस आगीच्या विळख्यात येण्याआधीच वाचला असुन श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने दक्षता घेऊन अग्निशमन सेवा वेळेवर उपलब्ध करून दिल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.गणेश कारखान्याची अग्निशमन वेळीच दाखल झाल्याने आसपासच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे.

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!