
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – जळगाव (ता.राहाता) परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती (दि.१४एप्रिल) रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी जळगावातील मुंजोबा चौकातील धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ यांच्या वतीने सकाळी जयंतीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रतिमा पूजन करण्यात येवून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माहिला भगिनींसह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी सहाय्यक फौजदार राजेंद्र लवांडे,शंकर चौधरी,माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र चौधरी,बाळासाहेब चौधरी,विजय चौधरी,बाबासाहेब चौधरी,भागवत वाघ,निलेश सदाफळ,सागर वैराळ,विशाल आल्हाट,चंद्रकांत वाघ,अभिषेक गायकवाड,अरुण गायकवाड,कुणाल गायकवाड,संभाजी काळे,महेश वाघ,अवंतिका गायकवाड,छाया गायकवाड,स्वप्नाली गायकवाड,रेखा गायकवाड,सुजाता गायकवाड,हिराबाई गायकवाड,अक्काबाई मोकळ,संगीता वैराळ,अनिता गायकवाड,सोनल वैराळ,सुमनबाई वैराळ,शिलाबाई लाहुंडे,चंद्रकला लाहुंडे,सुलोचना वैराळ,उज्वला काळे,सुरेखा काळे,सुनिता वाघ,संगीता वाघ आदीं माहिला भगिनींसह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
