
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
लोणी:(ता.२७) – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेची माजी विद्यार्थिनी कु. दिपिका संजय शिंगवी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्राथमिक पासून तर इयत्ता दहावी पर्यंत दीपिकाचे शिक्षण या विद्यालयामध्ये झाले. अशी माहीती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.
दिपिका या सुरुवातीपासूनच विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक टिकवला. इयत्ता अकरावीपासूनच चार्टर्ड अकाउंटंट स्पर्धा परीक्षेची तयारी तिने सुरू केली होती. चार्टर्ड अकाउंटंट ची स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी तिने कोल्हार येथे जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रवरा स्पर्धा अभ्यासिके मध्ये प्रवेश घेतला.आपल्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तिने यश मिळविल्याचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी सांगितले.
आई-वडील आणि शिक्षक त्यांच्याबरोबरच माझ्या या यशामध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केलेल्या या प्रवरा अभ्यासिकेचा खूप मोठा वाटा असल्याचे दीपिका ने सांगितले. कोल्हार परिसरातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन तिने केले.वडील संजय शिंगवी कोल्हार येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच सर्व मुलांना उच्चशिक्षित होण्यासाठी प्रेरणा दिली.
या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिताताई विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे आदींनी अभिनंदन केले आहे.सीईओ डॉ.सुश्मिता विखे पाटील डॉ. सदानंद हिरेमठ,लीलावती सरोदे इत्यादींनी अभिनंदन केले
