Uncategorized

बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मिशन आपुलकी’ उपक्रमातून चितळीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,चितळी येथे “मिशन आपुलकी” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या वाटप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. हा उपक्रम बिपिनदादा शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य गंगाधर भिवाजी चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते विक्रम वाघ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बिपिनदादांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला आणि वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमागील प्रेरणा स्पष्ट केली.

गावचे सरपंच नारायण कदम यांनी बिपिनदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची मनोभावे कामना केली. भाऊसाहेब पाटील चौधरी यांनीही आपले शुभेच्छा संदेश यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात गंगाधर चौधरी यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नवीन खोली बांधण्याची गरज अधोरेखित केली आणि ती उभारण्याचा आग्रह व्यक्त केला. कार्यक्रमासाठी गंगाराम कुंदे त्यास संदीप कलांगडे यांनी अनुमोदन दिले.

 

या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाठ, पर्यवेक्षिका अनिता सातव यांच्यासह गंगाधर चौधरी, भाऊसाहेब चौधरी, नारायण वाघ, विक्रम वाघ, मच्छिंद्र चौधरी, विजय चौधरी, सुभाष वाघ, भैय्यासाहेब वाघ, रमेश तनपुरे, छबुराव खरात, सुरेश कुराडे, शरद सोनवणे, महेंद्र चौधरी, किसनराव वाणी, संपतराव वाघ, तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण झुरळे यांनी केले, तर आभार महेंद्र चौधरी यांनी मानले.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!