प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उत्पादन पद्धती मार्गदर्शक तत्त्वे या विषयावर परिसंवाद संपन्न!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात सध्याच्या चांगल्या उत्पादन पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे या विषयावर एक दिवसीय परिसंवाद नुकताच संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.

 

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनां औषध निर्माण क्षेत्रातील सध्याच्या चांगल्या उत्पादन पद्धती आणि त्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे या बद्दल सखोल माहिती व्हावी या उद्देशाने या एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते परीसंवादासाठी लुपिन गोवाचे गुणवत्ता व्यवस्थापक आणि माजी विद्यार्थी प्रवीण बंगाळ, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे संचालक डॉ बी. एम.पाटील प्राचार्य पाटील आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

 

यावेळी प्रवीण बंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताने सांगितले कि औषधनिर्माण क्षेत्रात चांगल्या उत्पादन पद्धती व त्याचा वापर किती महत्वाचा आहे आणि त्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे हे नियामक ऑडिट च्या दृष्टीने औषधनिर्माण क्षेत्रात तितकीच महत्वाची आहे व त्याचा फायदा हा औषध निर्मितीमध्ये गुणवत्ता व्यवस्थापनासाठी कसा होतो यावर मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त भविष्यामध्ये नोकरीच्या संधी शोधताना नक्कीच होईल.महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता विभाग, माजी विद्यार्थी संघटना या विभागंतर्गत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबर नोकरीं व व्यवसायात उपयुक्त गोष्टींवरती विविध उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात येतात.या एक दिवसीय परिसंवादामध्ये मध्ये एकूण १२०विद्यार्थी सहभागी झाले होते.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. संतोष दिघे आणि प्रा.हेमलता भवर, यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. संतोष दिघे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. हेमलता भवर यांनी केले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!