
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात संशोधन अनुदानासाठी प्रस्ताव लिखाण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
या कार्यशाळेसाठी प्रोफेसर आर सी पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे डॉ. हितेंद्र महाजन , जे एस एस कॉलेज ऑफ फार्मसी, उटीचे प्राचार्य डॉ. प्रवीण थग्गीकुपे, डायरेक्टर ऑफ फार्मसी इन्स्टिट्यूशन चे डॉ.बी. एम. पाटील,डॉ. मंगाथायरु हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते संस्थेचे सहसचिव श्री भारत घोगरे पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ.हितेंद्र महाजन यांनी यशस्वी संशोधन प्रस्ताव कसा लिहावा व प्रस्ताव लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी व कुठल्या गोष्टी टाळाव्यात यावर मार्गदर्शन केले.डॉ प्रवीण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अनुदान देणाऱ्या संस्थे साठी संशोधन प्रस्ताव कसा लिहावा व त्यासाठी अगोदर सादर केलेल्या प्रस्तावांचा संदर्भ घेऊन कशी पूर्वतयारी करावी यावर आपले मत मांडले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात डॉ. बी एम पाटील यांनी उच्चभ्रू संस्था व ग्रामीण भागातील संस्था यामधील फरक स्पष्ट करताना सांगितले की ग्रामीण भागातील संस्थांना कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तसेच संशोधन निधीतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी असलेल्या उपाययोजना यावर त्यांनी मार्गदर्शन केले.शेवटच्या सत्रात डॉ. के.मंगाथायरु यांनी तुमचा संशोधन अर्ज शॉर्टलिस्ट करण्यासाठी पार करावे लागणारे अडथळे व त्यासाठी लागणारी पूर्वतयारी यावर कशी करावी यावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ . सुहास सिद्धेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. कविता विखे यांनी केले.
