महाराष्ट्रसामाजिक

चितळी स्टेशन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

आरपीआयच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील चितळी स्टेशन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच भीमराव कदम यांच्या हस्ते वंदना घेण्यात आली. श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कार्यक्रमास भेट देऊन सर्व अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे यांच्या दूरदृष्टीतून डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत चितळी पंचक्रोशीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये चितळी पंचक्रोशीचे कार्यक्षम सरपंच नारायण कदम, उपसरपंच कविताताई पगारे, जेष्ठ विधीज्ञ अँड. अशोकराव वाघ, लक्ष्मण गायकवाड, कमलेश वाडेकर, कैलास गायकवाड, नितीन वाकचौरे, फकीरा गायकवाड आणि हेमंत सरदार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या प्रसंगी छावा ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ, संदीप बनसोडे, शरद मगर, जाबीर शेख, विशाल बनसोडे, गजानन खरात, बाबासाहेब बनसोडे, रमेश जाधव, बंडू खरात, संजय गायकवाड, सौंदणे आप्पा, महेंद्र भोसले, गणेश मुसंडे, राजेंद्र आढाव ,संजू गाडे राहुल बनसोडे, डॉ.सोमनाथ औताडे, बाळू गायकवाड, किसनराव पाटील, संजय मगर, खंडू सोनवणे, अशोक शिंदे, झडे दादा, श्याम सोनवणे, बाळू पोटे, विकास वाघ, पोलीस पाटील राजेंद्र गायकवाड, राजेंद्र पवार, संदीप मगर, साहेबराव कांबळे, जगन्नाथ खरात, अशोकराव बनसोडे, मनोज गायकवाड, गौतम जाधव, अनिलराव कापसे, अनिल नळे, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर आग्रे, दत्तू सुसरे, एम. एल. शिंगारे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आरणे, कुणाल बनसोडे आणि उदय बनसोडे आदीसह चितळी पंचक्रोशीतील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!