धार्मिक

अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खा.निलेश लंके यांनी घेतले शनिदर्शन

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 प्रतिनिधी – राहुल राजळे.

अहिल्यानगर -दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मित्रपरिवारासह शनी प्रदोष निमित्त शनीवार (दि.२८) डिसेंबर २०२४ रोजी रात्री शनी दर्शन घेऊन शनी देवाच्या मूर्तीस तैलाभिषेक केला.

याप्रसंगी बोलतांना खा.निलेश लंके म्हणाले शनी भगवंताच्या दर्शनाने मनाला आत्मिक समाधान लाभलेयेणारे वर्ष राज्यातील जनतेला सुखाचे,समाधनचे व आरोग्यमय जावे यासाठी शनीचरणी प्रार्थना केलीअसल्याचे खा. निलेश लंके म्हणाले.

यावेळी खा लंके यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मढी देवस्थानचे उपाध्यक्ष इंजि सचिन गवारे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सतिष थोरात,अविनाश बानकर आदी उपस्थित होते.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!