महाराष्ट्र

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीतील यशाबद्दल व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन उपाध्यक्षपदी निवडीबद्दल गणेश कारखान्यात विवेक कोल्हे यांचा सत्कार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता –  कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. व मित्र पक्षांच्या लोकसेवा आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांनी नेत्रदीपक यश संपादन केले. या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तसेच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी युवा नेते विवेक कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

या सत्कार समारंभास गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, वसंतराव लहारे,नारायणराव कार्ले पाटील, भगवानराव टिळेकर, बाबासाहेब डांगे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, संपतराव हिंगे, गंगाधर डांगे, मधुकर सातव, विष्णुपंत शेळके,अनिल गाढवे,आलेश कापसे, डॉ. एकनाथ गोंदकर, बलराज धनवटे यांच्यासह कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शिंदे साहेब, सचिव नितीन भोसले तसेच गणेश परिसरातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!