महाराष्ट्र

दुहेरी हत्त्याकांडाची घटना म्हणजे श्री.साईबाबांच्या पवित्र शिर्डीला डागळणारी आहे शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवर केंद्राचे लक्ष वेधणार – खा.भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डीत पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढत चालला असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने याचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणारअसल्याची प्रतिक्रिया खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी – राहुल राजळे

 

राहाता :- शिर्डी हे जागतिक कीर्तीचे देवस्थान असून दररोज हजारो साईभक्तांची वर्दळ असणाऱ्या मुख्य रस्त्यावर नुकतीच घडलेली दुहेरी हत्त्याकांडाची घटना म्हणजे श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डीला डागळणारी असून वाढत्या गुन्हेगारीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची प्रतिक्रिया शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

जाहिरात

दिल्ली येथे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून खा.वाकचौरे दिल्लीला असताना शिर्डीतील दुहेरी हत्ताकांडाची माहिती मिळताच आपली पहिली प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. तात्काळ अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेत शिर्डीत धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात.शिर्डीत अवैध धंद्यामुळे वारंवार असे प्रकार घडत असून प्रशासनाने आता कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.

जाहिरात

 

साईभक्तांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशातून प्रचंड व्यसनाधीनता वाढली असून त्यातून असे प्रकार घडतात आणि निष्पाप व्यक्तींचा बळी जातो. याबाबत लवकरच पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थानचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक त्या कठोर उपाययोजना करणेबाबत निर्देशीत करणार आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास श्री साईंच्या मंदिर परिसरात केंद्राच्या अतिरिक्त सुरक्षा पथकाची नियुक्ती करणेबाबत तात्काळ केंद्रीय मंत्रीमहोदय यांना पत्राद्वारे सूचित करणार असल्याचे सांगितले.

जाहिरात

 

शिर्डीत पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढत चालला असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने याचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देत शेवटी चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा असा हिंसाचार आणि अत्याचार घडवतो असल्याची खंत व्यक्त केली. हत्त्याकांडातील दोन्हीही निष्पाप दिवंगत कर्मचारी हे साईबाबा संस्थानच्या सेवेत असल्याने त्यांच्याप्रति शोक व्यक्त करत परत अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडता कामा नये,याबाबत आम्ही अलर्ट झालो आहोत,याची ग्वाही दिली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!